महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: काथा उद्योगात 50 महिलांचे प्रशिक्षण सुरू!राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला उपक्रम

सावंतवाडी,


राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक नवी दिशा मिळाली आहे. काथा उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 50 प्रशिक्षणार्थींचे फॉर्म भरण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविण्याचा आहे. महिलांनी काथा पासून विविध वस्तू तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले आहे. कार्यक्रमात महिलांनी संघटनेचे आभार मानले व भविष्यात अजून अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली. “तुमच्या संघटनेचे काम खूप कौतुकास्पद आहे,” असे महिलांनी सांगितले. हे प्रशिक्षण दोन महिन्यांचे असून, त्यामध्ये सरकारी सबसिडीचाही समावेश आहे.

शुभारंभाच्या कार्यक्रमात माजी नगरसेविका भारती मोरे यांनी महिलांचे कौतुक केले व त्यांनी ठेचूनही छोट्या जागेत महिलांसाठी मोठे उपक्रम राबविण्याचे कौशल्य दाखवले आहे, असेही सांगितले. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी महिलांना स्वतःचा व्यवसाय कसा उभारावा याची माहिती देत उत्तम मार्गदर्शन केले.

कार्यक्रमालाकुडाळ तालुकाध्यक्ष अनघा आनंद रांगणेकर, शर्वरी धारगळकर, सायली होडावडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी सूत्रसंचालन करत संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी या संघटनेच्या प्रयत्नांचे संपूर्ण सिंधुदुर्गात कौतुक होत आहे, आणि हा उपक्रम महिलांना रोजगाराच्या नवीन संधी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.