वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न!हजारों भाविकांनी कोबे देऊन आपले नवस फेडले

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रसिद्ध लाखों भाविक श्री देव घोडमुख चरणी नतमस्तक

मातोंड

वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा आज वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला.

यावेळी सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु झाले.

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमांर्तडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. उंच डोंगर माथ्यावर विराजमान हे देवस्थानं आहे.३६० चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच्चगण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे.विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे. या ठिकाणीं वार्षिक जत्रोत्सव लां कोबा देऊन नवस फेडतात.हे या या उत्सवाचे महत्व आहे.तसेच शरीराच्या कुठल्याही अवयवांच दुखंण असेल तर येथे नवस बोलला जातो.हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते.

देशभरातून भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात. दुपारी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई या तरंगकाठ्यांसह घोडेमुख मंदिराकडे मार्गस्थ झाले.उंच डोंगर माथ्यावर देव तरंग काठीसह श्री घोडेमुख देव मंदीरात दाखल झाले.त्यांनतर वार्षिक रूढी परंपरा प्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यांनतर कोबे देऊन नवस फेडणे कार्यक्रम संपन्न झाला.

या जत्रोत्सवात सिंधुदुर्ग,गोवा,मुंबई,बेळगाव आदी भागातून या जत्रोत्सवासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्ताबाबत नियोजन करण्यात आले होते.सर्व भाविकांनी श्री देव घोडेमुख देवाचे सुलभ दर्शन घेता आले.