जनता विद्यालय तळवडेच्या १९९०-९१ च्या तुकडी कडून विद्यालयास दिला रंगपट बांधुन


पावणे दोन लाख रूपये खर्च करून सुसज्ज रंगपट दिला बाधून
सावंतवाडी
श्री जनता विद्यालय तळवडे च्या १९९०-९१ च्या तुकडी कडून विद्यालयास गरज असलेला रंगपट बांधुन दिला.श्री जनता विद्यालय तळवडे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.
या वेळी या रंगपटाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यालयाच्या १९९०-९१ च्या तुकडीने सुमारे पावणे दोन लाख रूपये खर्च करून सुसज्ज रंगपट बांधून दिला.१९९०-९१च्या तुकडीचे बाळकृष्ण सावंत हे गोव्यातील नामांकित सिप्ला कंपनीत मॅनेजर पदांवर कार्यरत आहेत.त्यांच्याच शुभहस्ते या रंगपटाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, विद्यालयाचे कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर,डाॅ.कांडरकर, सुरेश गावडे, अशोक वराडकर, रविंद्र परब, मुख्याध्यापक देसाई, दादा पेडणेकर,देवेश कावळे, निळकंठ नागडे, भुषण पेडणेकर,एल आय सी सल्लागार केशव तुळसकर, प्रसाद पेडणेकर, प्रसाद नागडे, सेसा गोवा कंपनीचे अभियंता गणपत पांढरे,हे १९९१ चे विद्यार्थी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते