सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात संविधान गौरव अभियान संपन्न

मळगाव

मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेत मोठ्या उत्साहातमध्ये संपन्न झाले. प्रथम महामानव डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्या नतंर मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि संविधान पूजन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच या निमित्ताने चित्र कला स्पर्धा दोन गटा मध्ये घेण्यात आली. शाळेतील मुलांनी या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला. प्रथम गट, इयत्ता 1ली ते दुसरी मध्ये , प्रथम क्रमांक- महेश्वरी सागर मळगावकर व द्वितीय कंमाक–स्वरा धोंडी जाधव यांनी प्राप्त केला. तसेच
दुसरा गट 2 -इयत्ता तिसरी व चौथी, यामध्ये
प्रथम क्रमांक –अर्णव जाधव.

द्वितीय कंमाक–पार्थ धोंडी जाधव.

मुलांना बक्षीस वितरण.श्री. चंद्रकांत जाधव संविधान गौरव समिती जिल्हा संहसयोजक तथा जिल्हा चिटणीस भाजप व माजी सरपंच अर्चना जाधव यांच्या हस्ते देण्यात आले .या नंतर मळगाव नवनिर्वाचित तिन्ही पोलिस पाटील यांचा सत्कार मा.श्री. चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. कुंभारर्ली पोलिस पाटील मा.सौ.गीत गजेंद्र गावडे, मळगाव ब्राह्मण साईस सावळाराम केरकर, मळगाव पोलिस पाटील दिपक जाधव..
यावेळी उपस्थितीत सर्वांना संविधान विषयी मार्गदर्शन मा.चंद्रकांत जाधव यांनी केले..
यावेळी मळगाव माजी सरपंच सौ.अर्चना जाधव, राकेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी , पालक वर्ग, सौ. प्रज्ञा धोंडो जाधव ,सौ.संपदा सागर मळगावकर..सौ.अंकिता अजित जाधव. सौ. स्वाती दीपक जाधव.सौ.मैथिली लाडू जाधव. शिक्षक मा. श्री.बबन तातू राऊळ सर,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

हा सर्व कार्यक्रम चंद्रकांत जाधव , जिल्हा सहसंयोजक – संविधान गौरव अभियान सिंधुदुर्ग, जिल्हा चिटणीस भाजपा, यांच्या मार्फत घेण्यात आला..या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बबन तातू राऊळ सर यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन राकेश चंद्रकांत जाधव यांनी केले…