विज्ञान विषयातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वांचां गौरव


सिंधुदूर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचा उपक्रम
कलसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या हॅकॅथोन स्पर्धा प्रशिक्षण निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केलेल्या व्यक्तीमत्वांचां गौरवकरण्यात आला.
कळसुळकर इंग्लीश स्कूलचे नवनियुक्त प्राचार्य सुर्यकांत भुरे, कुप्पम (आंध्र प्रदेश) सायन्स सेंटर येथे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या बी. आर. सी.च्या विज्ञान विषयाच्या तज्ञ मार्गदर्शक सरिता गावडे ,जिल्हा विज्ञान मंडळाच्या पदाधिकारी तथा आर.पी. डी.हायस्कूल सावंतवाडी येथील उपक्रमशील विज्ञान शिक्षिका प्रिती सावंत मॅडम, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा उत्कृष्ट गणित शिक्षिका पुरस्कारप्राप्त जनता विद्यालय तळवडेच्या विज्ञान शिक्षिका मिनल देसाई मॅडम, सावंतवाडी तालुका विज्ञान प्रदर्शनात यशस्वी कामगिरी केलेल्या विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगावच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सोनल कुवळेकर, कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या पुरस्कारप्राप्त, उपक्रमशील शिक्षिका सोनाली बांदेलकर ,प्रयोगशाळा सहाय्यक केसरकर मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके मॅडम,सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी सत्कारमूर्तींच्या विज्ञान विषयातील विशेष कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्तीनी जिल्हा विज्ञान मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, जिल्हा विज्ञान मंडळाचे पदाधिकारी संजय शेवाळे,धनराज सजगुरे,राजुदास जाधव,राठोड सर,साळसकर मॅडम,सावळ मॅडम यांनी केले.