सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील श्री सिद्धिविनायक मंदिरचा 32 व्या 1, एक फेब्रुवारी रोजी 25 रोजी, यावेळी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर 32व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन १ फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले आहे.

यावेळी श्री गणेश जयंती (विनायक चतुर्थी) मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिराचा 32 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.

यावेळी सकाळी 8 वाजता अभिषेक व होम हवन व धार्मिक विधी, दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद ,सायंकाळी 5 वाजता स्वर संध्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.रात्री 8 वाजता पालखी सोहळा ,व रात्र नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्वांनी तीर्थप्रसाद व महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर तळवडे आयोजक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.