कोकणात व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे! अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी कॉलेज अध्यक्ष


वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथे करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे करण्यात आले शानदार उद्घाटन

वेंगुर्ला
व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी अध्यक्ष यांनी यांनी वजराट येथे ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शनपर मत व्यक्त केले.
वेंगुर्ले तालुक्यातील वजराट पिंपळगाव येथील करिष्मा चंद्रशेखर सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन भोसले नॉलेज सिटी चे चेअरमन अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वजराट सरपंच सौ अनन्या आनंद पुराणिक, स्टेट बँकेचे झोनल ऑफिसर परमेश्वर नवघरे, कोकण रेल्वेचे राजु सुरती,वेतोरे मंडल अधिकारी सौ.निगरे , वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री पावसकर, माजी कॅप्टन प्रताप काका राणे,वजराट तलाठी ए. टी. गावडे,दिशा एन्व्हायरो केअर प्रदूषण नियंत्रण साकीब मिर,सामाजिक कार्यकर्ते चंदन गुरव, हर्ष सोनसुरकर व दामोदर सोनसुरकर आदी उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उस्थितीत होतें.

