वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीतील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भाजपा च्या वतीने गौरव

विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवुन आपल्या गावाचे नाव रोशन करा —

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग

वेंगुर्ला

मठ ग्रामपंचायत हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल भाजपा च्या वतीने सरपंच सौ. रुपाली नाईक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , भेटवस्तु व शाल देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर , उपसरपंच संतोष वायंगणकर , माजी सरपंच धोंडी गावडे , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर , युवा नेते अजित नाईक, ग्रा.पं.सदस्य शमिका मठकर उपस्थित होते.
यावेळी तबला वादन या क्षेत्रात संगीत विशारद ही पदवी मिळविल्याबद्दल कु.वेदांग महेश बोवलेकर , जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु.रुद्र दिगंबर मोबारकर , जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धा २०२४ – २५ प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनात निवड झालेल्या कु.काशिनाथ संतोष तेंडोलकर , जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धा २०२४ – २५ प्रथम क्रमांक कु. सुयश संतोष नांदोसकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला .
या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि आपल्या यशात शिक्षकांबरोबर आई – वडीलांचा सुद्धा वाटा आहे . यश मिळविण्यासाठी जिद्द , प्रयत्न व चिकाटी महत्वाची आहे . यश मिळविल्यानंतर हुरळुन न जाता यशात सातत्य ठेवणे आवश्यक आहे . विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात महत्वाची भुमीका बजावतात . विद्यार्थ्यांनी त्यात आपली छाप उमटवावी तसेच सुप्त गुणांचा विकास होण्याकरीता विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले .
यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्याना ज्ञानदान देणारे शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी पालक प्रा.महेश बोवलेकर सर , शिक्षीका अंजली माडये मॅडम , अवनि जाधव मॅडम , संतोष तेंडोलकर , सुशीला नांदोसकर , राजु मोबारकर , दुर्वा मोबारकर , मेहंदि बोवलेकर इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र खानोलकर यांनी केले .