सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी


खेलो इंडिया खेलो अंतर्गत गोवा येते घेत आहे शिक्षण
गोवा
सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाइफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५ वी वार्षिक आंतरशालेय जलतरण चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. त्यात ६० शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.
त्यात सध्या गोवा – म्हापसा येथील जी एस आमोणकर विद्यामंदिर येथे शिकत असलेल्या सिंधुदुर्ग – कुडाळ येथील कु. शमिका सचिन चिपकर हिने ३ गोल्ड, २ सिल्वर, २ ब्राँझ पदके पटकावली. ती आता खेलो इंडिया गोवा येथे सुजित सर यांच्याकडे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे
तिच्या या यशाबद्दल आमोणकर विद्यामंदिरच्या शिक्षकवृंदानी विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.
