शिरोडा-वेळागर येथील देव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात


वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम विविध धार्मिक पुजापाठ, लिंगेश्वरावर 5 ब्राम्हणांच्या माध्यमातून दुग्धाभिषेक, लघुरुद्र व वरद शंकर पुजनाने भाविकांच्या उत्स्फुर्त सहभागांत धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
शिरोडा वेळागर श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 22 वा वर्धापन दिन आज गुरुवारी मंदिरात विविध धार्मिक विधी, लिंगेश्वराच्या पिंडीवर ब्राह्मणांकरवी दुग्धाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेव लिंगेश्वरच्या पिंडीची व परिसराची विविध पुष्पपुजेने सजावट करण्यात आली होती. मंदिरात वरद शंकर महापुजा झाल्यानंतर देवतेची महाआरती नंतर देवतेस प्रतिवर्षी प्रमाणे वेळागर मधील सर्व रयतेच्या उपस्थितीत ब्राह्मणाकरवी गाऱ्हाणे देण्यात आले. त्यानंतर या देवतेस नारळ, केळी, पुष्पहार व फुले वाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली. श्री देव लिंगेश्वराच्या दर्शनांस आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम नियोजनबध्द करण्यात आला होता.. या सर्व कार्यकमांचा भाविकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
