पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन


आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार.
मालवण
आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीच सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे.या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत.आईच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसार पावणारी आई भराडी देवी सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करे असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला…