राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने आयोजीत 3वर्धापन दिन सोहळया निमित विवध क्षेत्रातील मान्यवरांना आले गौरविण्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोंसलेंच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सुरु आहे उल्लेखनीय कार्य!
राज्यसरचिटणीस चंद्रकांत धडकेमामा

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा आयोजित 3ऱ्या वर्धापन दिनास खासदार महाराज उदयनराजे भोसले यांनी दिल्या शुभेच्छा

रामचंद्र कुडाळकर :-सावंतवाडी

छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे हा सोहळा संपन्न झाला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. राजेंसोबत आम्ही काम करत आहोत हे आमचं भाग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगल काम सुरू आहे याचा आनंद अधिक आहे असं मत व्यक्त केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेना उल्लेखनीय कार्य करत असल्याचे प्रतिपादन राज्यसरचिटणीस चंद्रकांत धडकेमामासाहेब यांनी केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिले असे यावेळी मार्गदर्शन पर भाषण वेळी बोलत होतें.

सावंतवाडी भंडारी भवन येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये शिक्षिका स्वाती पाटील, भारती,ज्ञानेश्वर ठाकरे,अपर्णा थोरात, चंद्रकांत सावंत, रमाकांत गावडे, सुखदा जांबळे, दयानंद मठपती, संतोषी बांगर, प्रतिभा बारी, पत्रकार उमेश सावंत, प्रशांत मोरजकर, विनायक गांवस, उद्योजक जीवा राऊळ,सुधीर आडिवरेकर, कुणाल वरसकर, मंगेश माणगावकर, संदीप चांदेलकर, पूजा सोनसुरकर, सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर, रवी जाधव, नारायण उर्फ बाळा जाधव, जयराम आजगांवकर, गजेंद्र कोठावळे तसेच विवध क्षेत्रातील मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राजे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध, वेशभूषा, गणेश दर्शन स्पर्धांच्या बक्षीसांच वितरण यावेळी करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडकेमामासाहेब, उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी, जितेंद्र खानविलकर, राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सल्लागार डॉ. गोरख बोबडे, चित्रपट सेना सरचिटणीस सचिन जुवाटकर, चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य सचिव अक्षय म्हात्रे, महेश परब, अमोल डांगे मुंबई सहसचिव, सुभाष गजरे, जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या कार्यक्रमाला शुभेच्छा

या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिले असे यावेळी उपस्थित मान्यवर यांनी भाषण वेळी सागितले कोकणात या संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्य सुरु आहे हि बाब कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले. अश्या शुभेच्या त्यांनी पदाधिकारी यांच्यामार्फत पाठविल्या.

गणेश सजावट स्पर्धा याचे करण्यात आले बक्षीस वितरण

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महा सिंधू न्यूज चैनल मार्फत युट्युब व्हायरल व्हीव्हर्स गणेश सजावट स्पर्धेचे यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी प्रथम क्रमांक अनंत परब भोगवे, वेंगुर्ला ,द्वितीय क्रमांक रवींद्र केळुसकर वेंगुर्ला हो , तृतीय क्रमांक महेंद्र चव्हाण आंबोली ,चतुर्थ क्रमांक उतेजनर्थ श्री स्वामी पेडणेकर यांना रोख रककम, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र शाल श्री lफळ देऊन यावेळी गौरविण्यात आले मात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी, यांनी यावेळी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी गायक अक्षय म्हात्रे यांनी उदयनराजेंवरील सुप्रसिद्ध गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सचिव रामचंद्र कुडाळकर, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, सहसचिव कल्याण कदम, जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माणगावकर, पूजा सोनसुरकर, पुजा गावडे, नारायण सावंत, सुधीर धुमे, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सेजल पेडणेकर, मिलिंद डोंगरे, संचिता गावडे, अनघा रांगणेकर, सेजल पेडणेकर, केशव जाधव, अमर पाटील, उमेश तळवणेकर, संदीप चांदरकर, सचिन गावडे, श्याम सावंत, अंकिता सावंत, सुभाष गावडे, मकरंद मेस्त्री , सगिता पारधी साक्षी तळवणेकर, अंकिता माळकर, लक्ष्मण पेडणेकर, रणजित सावंत ,सुहासिनी शेट्ये, आरोही गवस, आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामचंद्र कुडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी तर आभार कल्याण कदम यांनी मानले.