भाजपा च्या वतिने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव

वेंगुर्ले तालुक्यातील जि.प.शाळा वेंगुर्ले नं. १ मधील दोन विद्यार्थी व वेंगुर्ले शाळा नं. ४ मधील एक विद्यार्थींनीचा शाळेत जाऊन सत्कार .

वेंगुर्ले शहरातील जि.प.शाळा नं.१ ( तालुकास्कुल )च्या इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु.वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात ४ क्रमांक तसेच इयत्ता ४ थी चा विद्यार्थी कु.पार्थ गजानन चिपकर याने तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला . तसेच वेंगुर्ले शाळा नंबर ४ ची विद्यार्थींनी हंसीका जगंन्नाथ वजराठकर हिने तालुक्यात दुसरा व जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळवून ह्या तिनही विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या सहलीत सहभाग नोंदवला याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या प्रशालेत जाऊन शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .
वेंगुर्ले शाळा नंबर १ मधील विठाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते दोन्ही गुणवंतांचा सन्मान करण्यात आला . यावेळेस मार्गदर्शन करताना राजन गिरप म्हणाले कि आपण आपल्या शाळेबरोबर आपल्या आईवडीलांचे तसेच तालुक्याचे नाव रोशन केले आहे . त्यामुळेच आपण कौतुकास पात्र आहात . आपल्या मधिल विद्यार्थी भविष्यात ” सुनिता विल्यम ” सारखी कामगिरी करेल , असा आशावाद व्यक्त केला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर , बुथ प्रमुख राजन केरकर , सौ.मयुरी राजन केरकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर , उपाध्यक्ष राकेश सापळे , मुख्याध्यापक हरमलकर , शिक्षीका सौ.लिना नाईक , सौ.आव्हाड मॅडम , सौ.कुशे मॅडम , शिक्षक मिलिंद सरवदे तसेच पालक सौ.साक्षी वेंगुर्लेकर , सौ.चिपकर , सौ.बागडे , सौ.तारी उपस्थित होत्या .
वेंगुर्ले शाळा नंबर ४ मध्ये भाजपा महिला मोर्चा च्या सौ.वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते हंसीका ज.वजराठकर हीचा सन्मान करण्यात आला . यावेळी आकांक्षा परब , मुख्याध्यापक श्रीम.संध्या बेहेरे , शिक्षक संतोष परब पदवीधर , श्री.सुधर्म गिरप , सुनंदा खंडागळे पदवीधर , सानिका कदम , नेहा परब उपस्थित होत्या .