तळवडे येतील श्री राम मंदीर ठिकाणीं राम जन्मोत्सव सोहळा थाटात पडला पार

सावंतवाडी

श्री राम जय राम जयजय राम अशा नामघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी तळवडे येतील श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.येथील श्रीरामनवमी उत्सव या कालावधीत श्रीराम नवमी महोत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन विवध आदी कार्यक्रम पार पडले. रविवारी श्रीरामनवमी दिवशी सकाळपासूनच रामभक्तानी रामजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात आलोट गर्दी केली होती. मंदिर परिसर राममय झाला होता. दुपारी राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.