सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.

यात सहा हजार किमतीच्या चांदीची पैजण व जोडे असे मिळून सात हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबतची तक्रार वीरेंद्र झिलू मिठबावकर राहणार वेत्ये दुकान मालक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे .

त्यानुसार चोरट्याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तळवडे बाजारपेठ या ठिकाणी मिठबावकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे ते आपले दुकान रात्री उशिरा बंद करून घरी गेले होते. आज शुक्रवारी सकाळी ते दुकानात आले असता दुकानाचे शटर हत्याराने तोडलेले त्यांना दिसले, यावरून त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे समजले याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. सावंतवाडी पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असता सात हजाराच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे दिसून आले आहेत, त्यानुसार अन्याय चोरट्याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंतवाडी तालुक्यात तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे. या बाजारपेठेत चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त पोलीस प्रशासन यांनी करावा अशी मागणी तळवडे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे.