मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग


मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग
सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन
सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बाबी लातये यांच्या निवासस्थानी सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला (मालक सुनील गोसावी) या नाट्यमंडळाचा विठ्ठल भक्तीवर आधारित ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाच्यावतीने आयोजित नाट्यप्रयोगाचे यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळ आयोजित व अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला प्रस्तुत कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ या नाट्यप्रयोगात अनिल गोसावी, करण खानोलकर, बाळू मांजरेकर, विनायक एरागी, दिनेश मराळ, पंढरीनाथ घाटकर, प्रशांत मेस्त्री, यश राणे, संदीप गावडे, समीर घाडी, दाजी मुंडये, चेतन कानडे, प्रशांत केरकर, सुरेश गोवेकर आदी कलाकार भुमिका साकारणार आहेत. तर त्यांना हार्मोनियम-प्रकाश सावंत, पखवाज-संतोष गोसावी, तालरक्षक-नरेंद्र किनळेकर संगीतसाथ करणार आहे. नाटकाची कथा संकल्पना अनिल गोसावी यांची आहे. मळगाव तसेच परिसरातील नाट्यप्रेमींनी विठ्ठल भक्तीवर आधारित असलेल्या या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.