तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी


विवध कार्यक्रमाचे भरगच्च करण्यात आले आयोजन

तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी
सावंतवाडी
तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल या कालावधी संपन्न होत आहे.


यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी 22 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे दुपारी 1.30 वाजता आरती व तीर्थप्रसाद सायंकाळी चार ते सात वाजता थळकर प्रसादी भजन मंडळ परबवाडी, उदिनाथ प्रसादिक भजन मंडळ परबवांडी ,ओमकार प्रसादिक भजन मंडळ सातवायगणी वारकरी भजन, सायंकाळी सात वाजता सखी फुगडी संघ पावशी संचालिका दीप्ती दिलीप ढवण , रात्री 8 वाजता जय संतोषी माता दशावता नाट्य मंडळ पेंडुर मातोंड यांचा नाट्यप्रयोग मालक श्री भास्कर वैद्य पुरस्कृत श्री देव थळकर प्रसादिक भजन मंडळ परबवांडी, 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार असून दुपारी1.30 वाजता आरती व तीर्थप्रसाद सायंकाळी चार ते सात वाजता दत्तप्रसाद पाटेकर भजन मंडळ खेरवाडी तळवडे, ब्राम्हण देव प्रसादिक भजन मंडळ परबवांडी, सात वाजता भजन संगीत महफिल व श्री गुंडू सावंत श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ पुरस्कृत थळकर बंधू रात्र आठ वाजता कलेश्वर नाट्य मंडळ नेरूळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे मालक श्री आबा कलिंगण , पुरस्कृत कुळकर बंधू,


तिसरे24 एप्रिल 2025 रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम सुरुवात होणार असून २ वाजून ७ मिनिटांनी शुभमुहूर्तावर शिखर कलश स्थापना होणार आहे.
दुपारी २. ३० वाजता आरती व तीर्थप्रसाद सायंकाळी ४ ते ७.३० वाजता श्री संत गोरोबा काका महिला ग्रुप तळवडे कुंभारवाडी – कीर्तन नारदीय किर्तन कीर्तनकार ह भ प ऋचा संजय पिळकर माणगाव महिलांसाठी सांस्कृतिक रंगांच्या आयोजन करण्यात आले आहे..
रात्रौ ८ वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचा नाट्य प्रयोग, मालक श्री बंड्या गोवेकर पुरस्कृत सद्गुरु दळवी होडावडा ,
चौथ्या दिवशी 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी या शुभमुहूर्तावर्षी देवी सातेरी परिवार देवतांची स्थापना नैवेद्य देवता प्रार्थना आशीर्वाद ग्रहण होणार आहे १. 3० वाजता आरती व महाप्रसाद सायंकाळी ४ ते ७ वाजता श्री राधाकृष्ण संगीत साधना गायक व शिष्य परिवार होडावडे, दत्तप्रसाद पाटेकर महिल मंडळ खेरवाडी फुगडी कार्यक्रम ,महिलांसाठी कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी 6:30 वाजता खास महीलासाठी कार्यक्रम होणार आहे, रात्रौ आठ वाजता नितीन आशियेकर प्रस्तुत श्रीदेवी भूमिका दशावता लोक कला नाट्य मंडळ मळगाव याचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे . पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा क्रमांक बाराचे शाखाप्रमुख सचिन मोरे, उपशाखाप्रमुख श्री विजय सिताराम पवार यांनी सहकार्य केले आहे. तरी सर्व भक्तगण ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानं स्थानिक सल्लागार उपसमिती तळवडे, व समस्त गावकर मंडळी, ग्रामोन्नती मंडळ मुंबई, भक्तगण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

