विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

सावंतवाडी

गुरुकुलच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळा सावंतवाडी नंबर 6 चा हर्षवर्धन राज्यात पाचवा, अक्षया राज्यात नववी तर विराज राज्यात दहावा.
जि.प.प्राथ.शाळा सावंतवाडी नं 6 च्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.इयत्ता पहिली चा कु.हर्षवर्धन तेजम राज्यात पाचवा व कु.अक्षया तुयेकर राज्यात नववी, इयत्ता दुसरीचा कु.विराज हेवाळे राज्यात दहावा तर कु.वैभवी चव्हाण,कु.सिद्धी गौंड आणि कु.ओंकार साळुंखे तसेच STS स्पर्धा परीक्षेत कु.जिक्रा शेख,कु.स्वराज साळुंखे,कु.सार्थकी कांबळे,कु.भूषण लाखे आणि कु.अशोक भिसे , यशवंत स्पर्धा परीक्षेत कु.शिवराज साळुंखे,कु.मेघा चव्हाण, कु.वैष्णवी खोचरे,कु.स्वरा नेमळेकर आणि कु.आरोही भिसे तर डॉ.APJ स्पर्धा परीक्षेत कु.शिवराज साळुंखे आणि कु. स्वरा नेमळेकर या विद्यार्थ्यांनी खूप चांगले गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
सदरच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका श्रीम.सायली लांबर मॅडम,श्रीम.मेघा गावडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
सदर गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकवृंदांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.समिक्षा खोचरे मॅडम, उपाध्यक्षा श्रीम.पुनम तुयेकर मॅडम, शिक्षणतज्ज्ञ श्री.दिलीप भालेकर सर , माजी नगरसेविका श्रीम. दिपाली भालेकर , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री गुरूप्रसाद तेजम सर व इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री केशव जाधव आणि पालकवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.