वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन


वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन
सावंतवाडी :
वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी- सिंधुदुर्गचे माजी खासदार व ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी गावडे यांना भेटून पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, रमेश गावकर, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (१५ मे रोजी) उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत गावडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. या निवडीबद्दल खासदार राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.