राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न.

      जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आदर्श समाज घडविण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य समाजाच्या प्रजाहितदक्ष आणि न्यायप्रिय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर भाजपा महिला उपाध्यक्ष सौ. सुषमा खानोलकर यांनी मार्गदर्शन केले.

राजमाता अहिल्यादेवी यांनी धर्म, समाज, संस्कृती व राजकारण यासर्व क्षेत्रामध्ये अद्वितीय असे कार्य करू एक आदर्श प्रस्थापित केला आहे. न्यायाची प्रतिमूर्ती म्हणून त्यांच्याकडे लोक आदराने पाहत. आज त्यांची ३०० वी जयंती साजरी करत असताना प्रत्येकाने त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरविण्याचा संकल्प करावा.असे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई यांनी मार्गदर्शन केले.तर आभार महिला मंडल अध्यक्ष सौ.सुजाता पडवळ यांनी मानले.

यावेळी मंडल अध्यक्ष श्री. पप्पू परब, मा.मंडल अध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्रप्रमुख प्रशांत आपटे,सौ.वृंदा गवंडळकर सौ.आकांशा परब,युवामोर्चा सरचिटणीस श्री. वैभव होडावडेकर ,युवामोर्चाचे श्री संतोष सावंत,सौ.हसिना मकानदार.सौ.शमिका बांदेकर सरपंच परबवाडा.सौ.कार्तिकि पवार सौ.स्वरा देसाई.सौ.अरुणा गंवडे.सौ.सुहिता हळदणकर परबवाडा ग्रामपंचायत सदस्य,बूथ प्रमुख प्रमोद गोळम,
जय अहिल्या!