ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित

सावंतवाडी

ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान गौरव सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन देऊन सन्मानित करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या माननीय व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, समाज कार्यातील सहभागा बद्दल त्यांना गौरविण्यात आले. प्रसिद्ध मराठी अभिनेता श्री. विश्वजीत पडते यांच्या हस्ते राजमुद्रा शिव सन्मान गौरव देऊन सत्कार करण्यात आला. त्या बद्दल संस्थेच अध्यक्ष श्री. नरपत जैन, मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.