कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा

सावंतवाडी प्रतिनिधि


रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कोकण रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्य कार्यालय ठिकाणी काढण्यात आला होता.

या मोर्चासाठी कर्नाटक ,गोवा आणि महाराष्ट्र येथील कोकण रेल्वे कर्मचारी ,तसेच अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले प्रकल्पग्रस्त land looser हेही मोठ्या संख्येने आलेले होते. अलीकडच्या काळामध्ये कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षा विभागात पॉईंट्समन आणि गेटमन या पदांवरती कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच खाजगी माणसं भरली आहेत .हा प्रवाशांच्या जिविताशी एक प्रकारचा खेळच प्रशासन करत असल्याचा आरोप रेल कामगार सेनेने केला आहे .त्याचबरोबर ही कॉन्ट्रॅक्ट भरती तातडीने थांबवून आपण त्या ठिकाणी कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त यांना प्राधान्याने. नोकरी द्यावी तसेच कोकण रेल्वे वरती कुठे ही कॉन्ट्रॅक्ट भरती करू नये ,कोकण रेल्वे वरती वाढत्या गाड्या लक्षात घेता रनिंग स्टॉप मध्ये लोको पायलट ,असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर यांची पुरेपूर संख्या भरावी. सिनियर गुड्स ट्रेन मॅनेजर ते पॅसेंजर ट्रेन मॅनेजरचा खूप दिवस रखडलेला प्रमोशन चा प्रश्न सोडवावा.

रेल्वे प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शेवटी कोकण रेल्वे तर्फे डायरेक्टर फायनान्स राजेश बदंग, तसेच मुख्य कार्मिक अधिकारी अनुराग मेश्राम यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या कॉन्ट्रॅक्ट भरती संदर्भात प्रकल्पग्रस्तांना कशाप्रकारे सामावून घेता येईल ,याविषयी विस्तृत चर्चा झाली आणि डायरेक्टर फायनान्स यांनी ती मान्य ही केले, याचबरोबर रेल्वे बोर्डाने मान्य केलेली 190 जागांची प्रॉपर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यामध्ये सुद्धा कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना उचित न्याय मिळेल असेही आश्वासन दिले. आता ठरल्याप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची यादी लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे पोहोचती करून त्यामधूनच तात्पुरत्या तत्त्वावर असणारी कॉन्ट्रॅक्ट लेबर ची भरती करावी असेही अंतिम रित्या ठरले. या वेळेला भटकळ येथील पॉइंट्स मन योगेश नाईक यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल त्याचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळेला प्रकल्पग्रस्तांपैकी मुकादम आणि अन्य सहकारी हजर होते.सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी अर्जुन जमखंडीकर चंद्रकांत विनारकर , सूर्यकांत आंबेकर ,सुरेश परदेशी ,भरत शर्मा ,राजू पवार, सुनील आगाव, राजेश कोकाटे, त्याचबरोबर कोकण रेल्वेचे सरचीटीनिस राजू सुरती, विलास खेडेकर, विश्वास राणे, कौस्तुभ ढेकणे, शिरोडकर, मुरगेशन ,दत्ता तेलंगे गजा गायकर, रवींद्र गुजर, प्रमोद ,नागराज,, मिनाज झारी,
फिरोज,संदेश,प्रेमकुमार उपस्थित होते

ट्रॅक स्पेशल साठी जेपिओ तातडीने बनवावा. त्याचबरोबर कोकण रेल्वे ,मध्य रेल्वे प्रमाणेच वेगळा झोन बनवून इंडियन रेल्वे मध्ये मर्ज करावी. आणि अशा अन्य मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते