तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी व्हाईस चेअरमन निशा शिरोडकर ,नारायण परब ,हरिश्चंद्र परब ,संतोष परब, रवींद्रनाथ परब. रविंद्र काजरेकर, रमाकांत राऊळ, गुरुनाथ गावडे ,मधुकर सावंत, स्नेहा कुंभार, श्यामसुंदर कुंभार, रामचंद्र जाधव ,सुरज डिचोलकर , सचिव संतोष राऊळ,तसेच वीणा कुंभार, कृष्णा जाधव , बाबुराव कुंभार, तसेच अन्य शेतकरी बाधव ,सोसायटी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शेतकरी वर्गाने भात खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन तळवडे विविध कार्यकारी सोसायटी मार्फत करण्यात आले आहे.