श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी , राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १८ डिसें २३ ते दि. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे निरवडे ठिकाणी आयोजन


सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ ते रविवार दि. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत ७ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरात, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘युवकांचा ध्यास : ग्राम – शहर विकास’ या उद्देशानुसार स्वच्छ भारत अभियान, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन, वीज बचत, जलसंवर्धन, बंधारा या विषयांवर जनजागृतीसाठी निरवडे, ता. सावंतवाडी येथे आयोजित केले आहे.
तरी या शिबीरास समाजातील विविध स्तरात काम करणाऱ्या व्यक्तींनी सदिच्छा भेट देऊन शिबिरार्थी स्वयंसेवकांना, कार्यक्रम अधिकारी यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले (अध्यक्ष सिं. जि. शि. प्र. मंडळ, सावंतवाडी), राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोसले (चेअरमन सिं. जि. शि. प्र. मंडळ, सावंतवाडी), युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले (कार्यकारी विश्वस्त सिं. जि. शि. प्र. मंडळ, सावंतवाडी), युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे लखमसावंत भोसले, डॉ. सतीश सावंत (नियामक मंडळ सदस्य), जयप्रकाश सावंत (नियामक मंडळ सदस्य), प्रा. डी. टी. देसाई (संचालक), अॅड. श्यामराव सावंत (सहसंचालक), प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. यु. सी. पाटील, डॉ. एस. जे जाधव, प्रा. आर. बी. सावंत, प्रा. एम. व्ही. आठवले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सावली गवस, तृप्ती वंजारी, श्रुती राऊळ, गोविंदा मोर्ये, कामाक्षी महालकर यांनी केले आहे.

या शिबिराचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ४.३० वा. संपन्न होणार असून उद्घाटक म्हणून ह. हा. राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हि. हा. राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे लखम सावंत – भोंसले, निरवडे गावाच्या सरपंच श्रीम. सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन बळीराम पेडणेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल उपस्थित राहणार असल्याचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. यु. सी. पाटील यांनी कळविले आहे.
‘या’ तज्ञांद्वारे होणार लोकशिक्षण व बौध्दिक चर्चासत्रे :
मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. रूपेश पाटील हे ‘ व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. यावेळी निरवडे गावाचे माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
बुधवार दि. २० डिसेंबर रोजी ‘ विविध पीक आणि अॅपची माहिती’ तसेच ‘विविध कृषी योजना माहिती’ या विषयांवर कृषी सहाय्यक यशवंत गव्हाणे आणि निरवडे गावाच्या तलाठी सौ. नमिता कुडतरकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी प्रतिष्ठित वकील रमाकांत मल्हार उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. संजय दळवी यांचे ‘सार्वजनिक आरोग्य व वैयक्तिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन होईल. यावेळी निरवडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी ‘विद्यार्थी व नेतृत्वगुण’ यावर जिल्हा प्रशिक्षक अनुभव शिक्षा केंद्राचे सहदेव पाटकर व्याख्यान देणार असून निरवडे गाव तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेंद्र गावडे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी ‘मसाला पिके लागवड’ याविषयी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. मैथिलीश प्रकाश सणस व्याख्यान देतील. यावेळी देवस्थान कमिटीचे श्री. नागेश गावडे उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात विविध मान्यवरांच्या भेटी असणार आहे.सदर शिबिरास मुंबई विद्यापीठाचे रासेयो कार्यक्रम समन्वयक, डॉ. सुधीर पुराणिक, कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे, मुंबई विद्यापीठाच्या रासेयोचे ओएसडी सुशील शिंदे, सहाय्यक शिक्षण संचालक व कार्यक्रम समन्वयक, कोल्हापूर श्रीमती स्मिता गौड, रासेयोचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा. व्ही. एच. सय्यद, रासेयो कोल्हापूर विभाग समन्वयक श्री. राजेंद्र कोळेकर, रासेयो सिंधुदुर्ग जिल्हा क्षेत्रीय समन्वयक प्रा. एम. के. बांबुळकर, रासेयो समन्वयक, सिंधुदुर्ग श्री. कांतिलाल जाधव, रासेयो जिल्हा क्षेत्रीय समन्वयक, सिंधुदुर्ग प्रा. सुरेश पाटील आदी मान्यवर भेटी देणार आहेत.
सदर शिबिराचा समारोप रविवार २४ डिसेंबर २०२३ सकाळी ०९.३० वाजता होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ह. हा. राणीसाहेब शुभदादेवी भोंसले उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले यांची उपस्थिती लाभणार असून यावेळी श्रीम. सुहानी गावडे, सरपंच श्री. अर्जुन पेडणेकर, उपसरपंच आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी हे शिबिर श्रीम. सुहानी सुहास गावडे, सरपंच, निरवडे, अर्जुन बळीराम पेडणेकर, उपसरपंच, उत्तम गंगाराम पांढरे , पंचायत समिती माजी सभापती प्रियांका प्रमोद गावडे, माजी पं. स. सभापती, श्रीम. स्मिता रविंद्रनाथ पाटकर (मुख्याध्यापिका, जि. प. प्रा. शाळा), प्रभारी पोलीस पाटील रमेश गोविंद जाधव ,ग्रामविकास अधिकारी श्रीम. सुनिता कृष्णा कदम, निरवडे तलाठी श्रीम. नमिता नागेश कुडतरकर, आरोग्य सेवक सतीश सुधाकर कुबल, कृषी अधिकारी श्रीम. प्रिया प्रदीप सावंत, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकर साबा गावडे यांच्या अथक प्रयत्नांनी सदर शिबीर संपन्न होणार आहे.