मातोंड पेंडूर गावचे देवस्थान 360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी जत्रोत्सव निमित्त लाखों भाविक झाले नतमस्तक !!

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस

तळवडे प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले.

तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या. त्या भक्तगणांनी त्यांचे आपल्या शरीरदोष दूर झाल्यावर मातीच्या वस्तू अर्पण करून आपले नवस पडले. हजारो भक्तगण यांनी कोंब्याचे नवस फेडण्यासाठी उंच डोंगर माथ्यावर असलेल्या श्री देव घोडेमुख चरणी नमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी लाखो भाविकांनी घोडेमुख देवाचे दर्शन घेतले. हजारों भाविकांनी कोंबे देऊन आपले नवस फेडले. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू होतो.यावेळी मोठयाप्रमाणावर गर्दी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगणांबरोबर गोवा , मुंबई,कर्नाटक तसेच अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात भावी श्री देव घोडेमुख देवाच्या दर्शनासाठी आले होते.

३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. श्री देव घोडेमुख देवाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भक्त जणांनी उंच डोंगर माथ्यावर असलेल्या मंदिर ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती .सिंधुदुर्ग तसेच अन्य महाराष्ट्र राज्या बरोबरच गोवा, व कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात भावीक दाखल झाले होते.

हा जत्रोत्सव कोंब्याचां जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव घोडेमुखाची ख्याती महाराष्ट्र राज्य बरोबर गोवा , कर्नाटक राज्यात पण पसरली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला कोब्याचा नवस बोलला जातो.व जत्रोत्सवावेळी फेडला जातो .शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तीभावे सर्व भक्तगण श्रद्धेने पाळतात.दरवर्षी वाढत चाललेली भक्तगणांची गर्दी या देवाची महती सांगून जाते. या जत्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी यावेळी दर्शनासाठी गर्दी केली होती.