तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी


सावंतवाडी
तळवडे गावातील श्री देवी बामणा देवीचा वांर्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२/१२/२०२३ रोजी होत आहे. श्री बामणादेवी च्या वार्षिक जत्रोत्सव ला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करतात.तळवडे खेरवाडी येथे वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी यांची महती आहे.यावेळी उत्सव दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर त्यानंतर ओठी ,भरणे नवस फेडणे आणि रात्री १२ वाजता पालखी सोहळा व लोटांगण फटाक्यांची आतषबाजी व रात्री १ वाजता कलेश्वर सुधिर कलिंगड प्रस्तुत दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.