कोरोना जेएन-वन व्हेरिएंट बाबत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना


चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
सिंधुदूर्ग
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविड तपासणी किट,ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर,आरटीपीसीआर लॅब,या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करावी, नियमित माहितीचा डॅशबोर्ड बनवावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांनी सद्यस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाय योजना आणि औषधी साठ्याची माहिती पालकमंत्री यांना दिली.