नागपूर नगरीत होणार महाराष्ट्राचा 57वा निरंकारी संत समागमहर्षोल्हासपूर्ण वातावरणात स्वेच्छा सेवांचा शुभारंभ

समागमाद्वारे प्रसारित होणार विश्वबंधुत्वाचा उदात्त संदेश


सिंधुदुर्ग

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26, 27 व 28 जानेवारी, 2024 दरम्यान एमएडीसी मिहान यांच्या सेक्टर 12A, 14 व 15, पतंजली फूड फॅक्टरी जवळ, सुमठाणा, ता.हिंगणा, जि.नागपूर येथील विशाल मैदानांवर आयोजित होणार आहे.

मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.​या भव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी ‘स्वेच्छा सेवांचे’ विधिवत उद्घाटन परम आदरणीय श्री.मोहन छाबड़ा, मेंबर इंचार्ज, प्रचार प्रसार, संत निरंकारी मंडळ यांच्या शुभहस्ते रविवार, दि.24 डिसेंबर, 2023 रोजी नागपूर, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत हर्षोल्हासपूर्ण वातावरणात करण्यात आले.
स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी पूज्य श्री मोहन छाबड़ा जी यांनी आपले भाव व्यक्त करताना म्हटले, की सद्गुरुच्या असीम कृपेने महाराष्ट्रातील भविक भक्तगणांसाठी सेवेची ही एक अमूल्य संधी प्राप्त झालेली आहे.
ते पुढे म्हणाले, की अशा प्रकारच्या संत समागमांचे आयोजन सद्गुरुच्या दिव्य दृष्टीकोनानुसार मानवाला मानवाशी जोडण्यासाठी केले जात असते. मनुष्य जेव्हा आपले नाते ईश्वराशी जोडतो तेव्हा तो सहजपणे समस्त भेदभावांच्या पलिकडे जातो आणि विश्वबंधुत्वाच्या धाग्यात गुंफला जातो. समागमाचे हे पर्व मानवाला ब्रह्मानुभूतीद्वारे आत्मानुभूती करुन स्वत:चा दर्जा उंचावण्याची सुसंधी प्रदान करत असते ज्यायोगे मनुष्य स्वत: सुंदर जीवन जगून धरतीसाठी सुद्धा एक वरदान बनून जातो.
​ ​हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी सिंधुदुर्ग व इतर जिल्ह्यातून निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठया तन्मयतेने पूर्वतयारीमध्ये जुटलेले लागले आहेत.