विहिरीत पडलेल्या सहा महिन्याच्या गवा रेड्या च्या पिल्लाचे प्राण होडावडे येतील अजित नाईक यां तरुणाने वाचविले

स्वतःचे धाडस दाखवून लहान , 6 महिन्याच्या गवा रेड्याच्या पिल्लाला दिले जीवदान

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात गवा रेड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल सायंकाळी होडावडे गावातील प्रसाद मराठे यांच्या काजू बागेत असणाऱ्या विहिरीत एक सहा महिन्याचां लहान गवा रेडा पडला होता . या लहान सहा महिन्याच्या गवा रेड्याचे प्राण होडावडे गावातील तरुण अजित शरद नाईक यांनी स्वतः विहिरीत उतरून वाचविले.
सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली .अजित नाईक हे त्या ठिकाणी कामानिमित्त बागेत गेले असता त्यांनी विहिरीत पाहिले असता एक लहान गवा रेड्याचे पिल्लू विहिरीत पडले होते, ते पूर्णपणे प्राण सोडण्याच्या तयारीत होते. परंतु जीव धोक्यात घालून अजित नाईक यांनी स्वतः विहिरीत उतरून सदर गवाड्याच्या पिल्लाचे प्राण वाचवले, सदर विहिरीतील पाणी हे कठड्या बरोबर काटोकाठ असल्याने सदर 6 महिन्याच्या गवा रेड्या च्या पिल्लाल त्यांनी स्वतः बाहेर काढले.

सदर लहान गवा रेडा पूर्णपणे प्राण सोडण्याच्या तयारीत होता. विहिरीत पडल्याने पूर्णपणे त्यांनी पाणी पिले होते .त्याला धडपाण्यात पोहता पण येतं नव्हते. सदरच्या लहान गवा रेडा पिल्लाला बाहेर काढून त्याच्या पोटातील पाणी दाबून बाहेर काढल्यावर ते जरा ठीक झाले व त्यानंतर थोड्या वेळाने त्या सहा महिन्याच्या गावात मध्ये थोडा जीव आला त्या नंतर ते जंगलात पळून गेले. त्यामुळें त्यामुळे लहान गवा रेडया पिल्लाला जीवदान देणाऱ्या श्री अजित शरद नाईक तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी घटनास्थळी होडावडे गावातील ग्रामस्थ सतीश मराठे ,दीपक दळवी तसेच अन्य शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होते. होडावडे गावात वांघेरी डोंगरामध्ये गवा रेडयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ते झाली शेतात आल्याने सोबत असणारे त्यांचे पिल्लू खाली शेतात आल्याने ते विहिरीत पडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर पिल्लाला वाचवण्यासाठी वन कर्मचारी यांना ताबडतोब बोलावणे कठीण होते. त्यामुळें सदर पिल्लू मरण्याची शक्यता होती .त्यामुळे नाईक यांनी स्वतःच या पिल्ल्याचे प्राण विहिरीत उतरून वाचवले.