सावंतवाडी पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने आज श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन; पत्रकारांना देण्यात येणारं विमा पॉलिसी संरक्षण

कार्यक्रमाचे उद्घाटन होणार वेतोबा मालिकेतील कलाकार यांच्या हस्ते

सावंतवाडी प्रतिनिधी


सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहे
या स्पर्धेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक 1 ते 10 श्लोक, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गीताई 15 वा अध्याय 1ते 15 श्लोक पठण आणि आठवी ते दहावीच्या मुलांसाठी भगवत गीता 12 वा अध्याय 1 ते 10 श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेचे उद्घाटन सन टीव्हीवरील प्रसिद्ध वेतोबा मालिकेतील भोळ्या मामा, मामी, शालग्या आणि बायो आदी कलाकार तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व पत्रकार अधिसूचिधारक समितीचे सदस्य गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर हे उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने करण्यात आले आहे
या स्पर्धेतील विजेत्यांना लगेचच पारितोषिक वितरण वेतोबाच्या भूमिकेतील उमाकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमापूर्वी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींना १० लाख रुपयांचा पोस्टाचा आयुर्विमा प्रदान करण्यात आला आहे.याचा शुभारंभ दुपारी दोन वाजता याच ठिकाणी होणार आहे.तरी सर्व पत्रकारांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सचिव मयुर चराठकर यांनी केले आहे.