श्लोक पठण स्पर्धेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची विद्यार्थ्यांने मारली बाजी


सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उपक्रम
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 30 डिसेंबर2023 रोजी मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक 1 ते 10 श्लोक, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गीताई 15 वा अध्याय 1ते 15 श्लोक पठण आणि आठवी ते दहावीच्या मुलांसाठी भगवत गीता 12 वा अध्याय 1 ते 10 श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाचवी ते सातवी या गटातून प्रशालेतील कु. ऋतुजा कुसुमाकर मातोंडकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेसाठी तिला तिचे पालक, प्रशालाचे मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले होते. तिच्या या उत्तुंग भरारी बद्दल सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे. प्रशालेचे चेअरमन आदरणीय नरपत जैन सर , डॉ.शेखर जैन सर यांनी तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.