विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याच्या निकालानंतर शिवसेनेच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात जल्लोष

सिंधुदूर्ग

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना खरी शिवसेना ही शिंदे गटाची असे जाहीर केले.त्याचबरोबर व्हीप च्या आधारावर आमदारांना पात्र ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

फटाक्याची आतीषबाजी व एकमेकांना लाडू भरवत हा आनंदोत्सव साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , वेंगुर्ला कणकवली कुडाळ तसेच जिल्ह्यातत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.