शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सावंतवाडी ठिकाणी जंगी स्वागत!

मोदी सरकारची आगामी निवडणुकीत गॅरेंटी नाही ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सावंतवाडी

मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काय दिले अशी विचारणा झाली. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. तर दुसरीकडे पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी दिली. परंतु नौसेना दिनानिमित्त संदर्भात आलेल्या पंतप्रधानांनी तो प्रकल्प गुजरातमध्ये पळविला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथे केली.

आगामी काळात येथील जनतेने मिले जुले सरकार असलेल्या महाविकास आघाडी सरकार सोबत रहावे. दुष्काळात तेरावा महिना असणाऱ्या मोदी सरकारची आता गॅरंटी नाही, असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते भास्कर जाधव, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबुराव धुरी, मंदार शिरसाट,अतुल रावराणे मायकल डिझोजा रुची राऊत, बाळा गावडे, जानवी सावंत, यशवंत परब, कौस्तुभ गावडे, सागर नाणोसकर, हिमांशू परब, आदी पदाधिकारी तसेच शिवसेना कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.