आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !लोकसभा तयारीसाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी येतील सभेत विरोधकांवर जोरदार टिका ठाकरे यांनी केली.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्यावर टिका केली. केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने मी शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले परंतु ते गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील खुर्चीची उब त्यांना मिळेल. पणं गद्दारीचा डाग कधीही पुसला जाणार नाही. ते इमानदार होऊच शकत नाहीत, असा आरोप सावंतवाडी येतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आहात ना अशी भावनिक साथ त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना घातली. यावेळी उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सावंतवाडीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते भास्कर जाधव, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबुराव धुरी, मंदार शिरसाट, अतुल रावराणे मायकल डिझोजा रुची राऊत, बाळा गावडे, जानवी सावंत, यशवंत परब, कौस्तुभ गावडे, सागर नाणोसकर, हिमांशू परब, आदी पदाधिकारी उपस्थित होते.