आंबोली घाट रस्त्याच्या कामात चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार!!सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू , कार्यकारी अभियंता यांना दिला अंतिम इशारा

सावंतवाडी

आंबोली घाट रस्त्याच्या कामात आता पर्यंत तब्बल चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे.  असा गंभीर आरोप आज येथे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यांनी दिला.

आंबोली घाटात झालेल्या निकृष्ठ कामांबाबत माहिती मागितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली नाही. त्यामुळे श्री. साळगावकर यांनी आपल्या शिष्टमंडळाला घेवून कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सिताराम गावडे, उमाकांत वारंग, दीपक सावंत, उमेश कोरगावकर, महादेव राऊळ, मिहीर मठकर, बंड्या तोरसकर, तुकाराम कासार आदी उपस्थित होते.