सावंतवाडीत उद्यापासून महासंस्कृती महोत्सव शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन


सावंतवाडी
सावंतवाडी ठिकाणी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ऐतिहासिक सावंतवाडी शहरात ६ ते १० फेब्रुवारी पर्यंत ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी, बुधवारी महाराष्ट्राची संस्कृती, गुरुवारी महानाट्य शिवबा, शुक्रवारी मराठी बाणा व शेवटच्या दिवशी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेंच्या सुरेल संगीत रजनीची मेजवानी सावंतवाडीकरांसह जिल्हावासियांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे