केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी भूमिपूजन प्रसंगी वडखोल वासीयांशी संवाद साधताना मा.आम. राजन तेली म्हणाले की वेंगुर्ले शहराचा विकास हा भाजपाच्या माध्यमातून झाला . भाजपाचा नगराध्यक्ष वेंगुर्लेत विराजमान झाल्यावर तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी वेंगुर्ले नगरपरिषदेस दिल्यामुळेच वेंगुर्ले शहराचा सर्वांगीण विकास झाला .
यावेळी सर्वप्रथम भाजपा ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी माजी आमदार राजन तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , मा.उपनगराध्यक्ष दाजी परब , जेष्ठ नेते सोमनाथ टोमके , युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर व प्रणव वायंगणकर , ता.चिटणीस जयंत मोंडकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर ,श्याम केरकर, रमाकांत केरकर , शेखर पालयेकर, हेमंत तुळसकर , निकेश पवार , अविनाश केरकर, मक्तेदार गावडे इत्यादी उपस्थित होते .