खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निरवडे येथील रोहिदास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्ध
खासदार विनायक राऊत

सावंतवाडी

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील रोहिदास नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपतालुका प्रमुख संदीप पांढरे,विभाग प्रमुख विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, तसेच युवासेना पदाधिकारी सागर नानोसकर , रोहन मल्हार, मधुकर भाईडकर, आणि निरवडे गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.


यावेळी खासदार विनायक राऊत यांनी निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या घरी भेट दिली., त्यावेळी त्यांचे मल्हार कुटूंबिय याच्यावतिने खासदार विनायक राऊत यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी रोहन मल्हार कुटुंबीय यांनी खासदार विनायक राऊत यांचे स्वागत केले.