आरोस येथे ९ एप्रिल ते १८ रोजी रामनवमी निमित्त नाटय महोत्सवचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि


श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,आरोस आयोजित ९ एप्रिल ते १८ रोजी पर्यंत श्री देव गिरोबा रंगमंच आरोस,गिरोबावाडी येथे रोज संध्याकाळी ७ वाजता किर्तन व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ९ रोजी रात्री ९.३० वाजता तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ,झाराप यांचा ‘ पुण्यप्रभाव ‘ बुधवार १० रोजी रात्री ९.३० वाजता श्री देव मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ,मोरे यांचा ‘ दिप माझ्या वंशाचा ‘ गुरुवार ११ रोजी रात्री ९.३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,चेंदवण यांचा ‘ भक्ती महिमा ‘ शुक्रवार १२ रोजी रात्री ९.३० वाजता श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ,मळगाव यांचा ‘ दुष्यंत शकुंतला ‘ शनिवार १३ रोजी रात्री ९.३० वाजता वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ,तेंडोली ‘ अघोर लक्ष्मी ‘ रविवार १४ रोजी रात्री ९.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ,आरोस दांडेली यांचा ‘ रात्रीस खेळ चाले ‘ सोमवार १५ रोजी रात्री ९.३० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा ‘ मीनाक्षी सुंदरेश्वर ‘ बुधवार १७ रोजी दुपारी १२ वाजता रामजन्म रात्री १० वाजता श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,व प्रविण मांजरेकर दिग्दर्शक सामाजिक नाटक ‘ नटसम्राट ‘ गुरुवार १८ रोजी रात्री ९.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त नाटक ‘ कालीकंकाली हा नाट्यप्रयोग होणार आहे.