उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर जाहीर व्यक्त होणार नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे


सावंतवाडी प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मीडियासमोर जाहीर वक्तव्य करणार नाही असे नारायण राणे यांनी सांगितले यांच्या या निरुत्तरी प्रश्नांमुळे उमेदवारी बाबत नेमका कोणता पर्याय दिला जातो याचे उत्सुकता लागून राहिली आहे यावेळी भाजपा प्रदेश नेते दत्ता सामंत युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, संजू परब,महेश सारंग, रेश्मा सावंत आधी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
