तळवडे येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त 14 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीराम कलाक्रीडा मंडळ गडगेवाडी तळवडेचे आयोजन

सावंतवाडी

श्रीराम कलाक्रीडा मंडळ गडगेवाडी तळवडे आयोजित श्रीराम नवमी उत्सव 2024 निमित्त आज 14 एप्रिल ते 17 एप्रिल 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन तळवडे येथील श्रीराम मंदिर गडगेवाडी या ठिकाणी करण्यात आले आहे .

यावेळी 14 एप्रिल रोजी हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारीवडे यांचा विधीलेख हा नाट्य प्रयोग होणार आहे .तसेच 15 एप्रिल 24 रोजी सुस्वर भजन कार्यक्रम होणारं आहे.
तर 16 एप्रिल रोजी ह भ प श्री धुपकर बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.17 एप्रिल रोजी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी 12 वाजता ह भ प श्री करंबेकर याचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, संध्याकाळी सात वाजता भजन कार्यक्रम, रात्री नऊ वाजता ह भ प श्री मुंडले बुवा यांची सुश्राव्य कीर्तन, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा श्री राम भक्त यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम कलाक्रीडा मंडळ गडगेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.