स्पर्धा परीक्षांमध्ये वेंगुर्ला तालुक्यांतील केंद्रशाळा होडावडा नं.१ चे यश


वेंगुर्ला प्रतिनिधि
वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावातील केंद्रशाळा होडावडा नं.१ ने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे.
सन 2023/24 मध्ये झालेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत शाळेची कू. गार्गी मुरलीधर सातार्डेकर व कु. साईश समीर सावंत यांनी गोल्ड मेडल पटकावले.तर कु. विहंग सुशील पांचाळ हा ब्राँझ मेडलचा मानकरी ठरला. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत ब्राँझ मेडलचे मानकरी ठरले.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश मिळवले असून कु. गार्गी सातार्डेकर व कु. साईश सावंत हे संयुक्तरीत्या राज्यात 3 रे आलेत.तर पाहिलीतील कु. सोहम संदीप सातार्डेकर हा राज्यात 11 वा आला.या मुलांना वर्गशिक्षक श्रीम. तन्वी बांदिवडेकर, श्रीम. अर्चना मक्राणे व मुख्याध्यापक श्रीम. प्रशांती दळवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शा.व्य.स.अध्यक्ष श्री.समीर सावंत. उपाध्यक्ष सौ.नंदिनी कामत सर्व सदस्य, सर्वपालक तसेच होडावडा केंद्रप्रमुख श्री.लवू चव्हाण सर यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.