भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

धगधगत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली!

गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री उदय सामंत,मंत्री दीपक केसरकर,मंत्री रवींद्र चव्हाण ,राष्ट्रवादी आमदार निकम,किरण सामंत यांची उपस्थिती

रत्नागिरी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे साहेब यांनी रॅली द्वारे प्रचंड शक्तिप्रदर्शन करत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

रत्नागिरी मारुती मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे भारतीय जनता पार्टी व कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीत केंद्रीय मंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर , मंत्री उदय सामंत,राष्ट्रवादी आमदार श्री निकम,माजी खासदार निलेश राणे,भाजप आमदार नितेश राणे,,सेना नेते किरण भैया सामंत,माजी आमदार बाळ माने,जिल्हाध्यक्ष श्री. पटवर्धन,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,माजी आम.प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली,माजी आमदार अजित गोगटे,बँक अध्यक्ष मनिष दळवी,प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,गोट्या सावंत,मनोज रावराणे ,समीर नलावडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व शिंदे गट कार्यकर्ते मोठ संख्येने उपस्थित होते.तर रत्नागिरी मधील महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाईन द्वारे शुभेच्छा दिल्या. विदर्भात आज मतदान असल्याने येता आलं नाही पण निवडणूक प्रचारदरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गात येणार असल्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते.त्यामुळे तुफान गर्दी झाली होती..