सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती 

सावंतवाडी । प्रतिनिधी

 सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, राजन पोकळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश गवस, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, ॲड. निता सावंत महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक,सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, आनंद नेवगी, सौ. दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, रवि मडगांवकर, प्रेमानंद देसाई, पुखराज पुरोहित, गुरुनाथ पेडणेकर, गुणाजी गावडे, जावेद खतिब, केतन आजगांवकर, संतोष गांवस, अमित परब, विनोद सावंत, चंद्रकांत जाधव, निशिकांत तोरस्कर, दिलीप भालेकर, मेघना साळगांवकर, सचिन बिर्जे, अजय सावंत, संतोष वेजरे, महेश धुरी, मानसी धूरी, मधुकर देसाई, अशोक पवार, दिनानाथ नाईक, सुकन्या टोपले, किशोर चिटणीस, राघू चितारी, विराग मडकईकर, नयनेश गावडे, ज्ञानेश्वर सावंत, परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.