सावंतवाडीत साईबाबा मंदिरात वर्धापन दिन थाटात साजरा


सावंतवाडी :
शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, कार्यक्रम झाला तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन, रात्री ८ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘रक्तवर्ण जन्म’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
यावेळी साई भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला. साईभक्त मंडळ भवानी चौक यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.