दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे


सावंतवाडी
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर आणि बाळा गावकर ,यांनी दिली. यावेळी संग्रह सवास्तु पुनप्रतिष्ठापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज याबाबत मंदिरात सोनुर्ली, मळगाव येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी देवाला कौल लावण्यात आला. या नंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.श्री देवी माऊली चे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, देवीच्या या सोहळ्यामुळे भक्तगणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

