

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात! माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती
शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवार, सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाले आहेत. त्यानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असली तरी, उद्या रविवार, १६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
सावंतवाडीमध्ये सध्या महायुतीमध्ये धुसफूस सुरू असतानाच, शिंदे शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला असून, दहा प्रभागांमधून एकूण वीस उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) अर्ज भरणार होते, मात्र आता रविवार, १६ नोव्हेंबर चा मुहूर्त काढण्यात आला असून, उद्या जल्लोषी वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील.
आमदार केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, “महायुतीशी आमचे बोलणे सुरू आहे, परंतु इच्छुक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरत आहोत. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उच्चशिक्षित आहेत.”





