संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थां कडून मोलाचे असे दान ‘श्रमदान’

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थांकडून मोलाचे असे दान ‘श्रमदान’…

वेंगुर्ला
मातोंड – पेंडूर गावच्या सीमेवर असलेल्या व 360 चाळ्यांचा अधिपती असलेले श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी पार पडला.जागृत देवस्थान मानले जाणाऱ्या या जत्रोत्सवास असंख्य भाविक समुदाय लोटला होता.शनिवार दिनांक 07 शुक्रवार रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत पेंडूर ते श्री देव घोडमुख मंदिर पर्यंतचा सर्व परिसर श्रमदानातून स्वच्छ करून शाळेचे नाव खऱ्या अर्थाने सार्थक केले.विद्यार्थ्यांसोबत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हेमंत तानावडे सर, प्रशालेतील शिक्षक श्री. मनिष सावंत सर,शिक्षिका श्रीमती रुची देसाई मॅडम, श्रीमती अश्विनी सावळ मॅडम, यांनीही श्रमदानात आपले योगदान दिले.विद्यार्थी व शिक्षक यांना प्रशालेचे चेअरमन डॉ.शेखर जैन सर, यांचे मार्गदर्शन लाभले होते.
प्रशलेलचे चेअरमन डॉ.शेखर जैन सर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शब्द सुमनानी कौतुक केले.