तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन

सावंतवाडी

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी शुक्रवार 13, डिसेंबर रोजी 2024, रोजी साय.7 वाजता कीर्तनकार ह भ प बुवा विनोद च्यारी गोवा यांचे कीर्तन ,14, डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्त मुर्ती पूजन, सायंकाळी 7 वाजता तळवडे कुंभारवाडी येथील मंडळाचा वारकरी संप्रदायाचे हरिपाठ ,रात्रौ 8 वाजता उमळकर प्रसादिक भजन मंडळ कुडाळ बुवा अमित उमळकर यांचा भजनाचा कार्यक्रम , रात्रौ 9 वाजता स्थानिकांची भजने , रात्रौ 11 वाजता ह भ प श्री दत्ताराम कडव आंबेगाव यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन रात्रौ 12 वाजता श्री दत्त जन्म सोहळा व महाआरती रात्रौ 1 वाजतामामा मोचेमाडकर नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग, रविवार 15 डिसेंबर रोजी सकाळी मूर्ती पूजन, दुपारी महा आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे, तरी श्रीदत्त भक्तानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तात्रय सेवा मंडळ, परब तेंडुलकर कुटुंबीय यांनी केली आहे.