मंत्री दिपक केसरकर यांनी तळवडे येतील भाजप व शिवसेना कार्यालयास दिली भेट पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

भाजप शिवसेना पदाधिकारी आपण एकदिलाने काम करत आहोत यांचे श्रेय खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते

मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे, मळगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांना भेटून दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी

सुख आणि शांती यामुळे घरात लक्ष्मीची पावले येतात या दिवाळीनिमित्त सर्व जनतेच्या घरात सुख समृद्धी येऊ दे व व्यापारी वर्गाची उन्नती होउदे तसेच अशा स्वरूपाच्या शुभेच्छा मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे येथे दिपाली निमित्त भेटी दरम्यान मत व्यक्त केले. मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीनिमित्त तळवडे बाजारपेठ तसेच मळगाव तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये भेटून व्यापारी वर्ग दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या भेटी दरम्यान भाजप शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिंदे गट शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी सरपंच निरवडे प्रमोद गावडे, सुरज परब, महेश परब जालिंदर परब, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी भाजप पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तळवडे रिक्षा संघटनेतर्फे मंत्री दीपक केसरकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.

यावेळी केसरकर यांनी भाजप कार्यालयात भेट देऊन भाजप कार्यकर्त्यांची संवाद साधला यावेळी आपण सर्वांनी एक दिल्याने काम करून आपल्या विजय साध्य करूया असे मार्गदर्शन केले आपली एक जोडी मंत्री खासदार नारायण राणे व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुळे झाली आहे

त्यामुळे आपण एकोप्याने काम करूया व आपलं विजय साध्य करूया असे यावेळी केसरकर म्हणाले यावेळी भाजप कार्यालय तसेच शिवसेना कार्यालयात मंत्री दीपक केसरकर यांचे जंगी स्वागत करण्यात आलं तसेच तळवडे अर्बन बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला तळवडे शाखां यास यावेळी केसरकर यांनी भेट दिली यावेळी त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आलं. यावेळी या सर्वांना भेटून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.